धक्कादायक! रुग्णालयात महिलेवर बलात्कार

हरियाणातील एका खासगी रुग्णालयात आयसीयूत असलेल्या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. ही पिडीत महिला दिल्ली पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी आहे. 

Updated: Feb 14, 2016, 04:14 PM IST
धक्कादायक! रुग्णालयात महिलेवर बलात्कार title=

चंदीगड : हरियाणाच्या झुज्जार जिल्ह्यातील बहादूरगड येथील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूत उपचार घेत असलेल्या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. ही पिडीत महिला दिल्ली पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी आहे. 

सिजेरियन झाल्यानंतर पिडीत महिलेला आयसीयूत दाखल करण्यात आले होते. यावेळी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पिडीत महिलेने दिलेल्या साक्षीनंतर आरोपीवर कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पिडीत महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचा आरोप केलाय. ज्यावेळी ही घटना घडली त्याने आयसीयूमध्ये कोणीही स्टाफ उपस्थित नव्हते. दरम्यान, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. आरोपी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र त्याची ओळख पटलेली नाही.