प्रभूकृपा, जलदूतचे ४ कोटीचे पाणी बिल मागे

दुष्काळग्रस्त लातूरला मोठा गाजावाजा करत रेल्वेने पाणी पाठविण्यात आले. एकदा नव्हे तर तीनवेळा पाणी पाठविण्यात आले. ६.२० कोटी लिटर पाणी रेल्वेने पाठविले. मात्र, पाणी बिलापोटी चक्क ४ कोटी पाठविले. सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हे बिल मागे घेत असल्याचे जाहीर केलेय.

Updated: May 13, 2016, 06:29 PM IST
प्रभूकृपा, जलदूतचे ४ कोटीचे पाणी बिल मागे title=

नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त लातूरला मोठा गाजावाजा करत रेल्वेने पाणी पाठविण्यात आले. एकदा नव्हे तर तीनवेळा पाणी पाठविण्यात आले. ६.२० कोटी लिटर पाणी रेल्वेने पाठविले. मात्र, पाणी बिलापोटी चक्क ४ कोटी पाठविले. सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हे बिल मागे घेत असल्याचे जाहीर केलेय.

 
पाणी पोहोचविण्यासाठी वाहतुकीचे चार कोटींचे बिल मध्य रेल्वेकडून लातूर जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनाच हे बिल सादर करण्यात आले. पाण्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा जो खर्च झाला, त्याचे बिल मध्य रेल्वेने पाठविले होते.

हे बिल पाठविल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने हात वर करताना म्हटले, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाण्याच्या वाहतुकीच्या खर्चाचे बिल पाठवले आहे. आता हे बिल थेट चुकते करायचे की त्यातून सवलत मागायची याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला घ्यायचा आहे. आम्ही आमचे काम केलेय.

गेल्या महिन्यात ११ तारखेला मिरजेहून पाच लाख लिटर पाणी घेऊन रेल्वेच्या दहा वाघिण्या लातूरकडे रवाना झाल्या होत्या. लातूरमध्ये १२ एप्रिलपासून या पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. मिरज ते लातूर हे सुमारे ३४२ किलोमीटरचे अंतर रेल्वेच्या वाघिण्यांनी पाणी वाहून नेले. रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासाठी राजस्थानमधून खास वाघिण्या मागविण्यात आल्या आहेत. लातूरला ५० वाघिण्यांमधून २५ लाख लिटर पाणी सध्या देण्यात येत होते.