नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावलीय.
अरुण जेटली यांची मुलगी सोनाली हिचा विवाह बिझनेसमन आणि वकील जयेश बख्शी यांच्यासोबत पार पडलाय. सोनाली-जयेश यांच्या लग्नाचं रिसेप्शन सोमवारी रात्री दिल्लीत आयोजित करण्यात आलं होतं.
अभिनेता शाहरुख खान याचीही या रिसेप्शनसाठी खास हजेरी होती.
या रिसेप्शनमध्ये अनेक केंद्रीय मंत्री, उद्योगपती, फिल्मी सितारे, सरकारी अधिकारी आणि अनेक राजनैतिक दलांचे नेते उपस्थित झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.