नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या पंजाबमधील पठाणकोटला भेट दिलीय. या भेटीमध्ये मोदींना हवाई पाहणी देखील केली.
सेनाप्रमुख, नौसेना प्रमुख आणि जवानांशी यावेळी मोदींनी संवाद साधला. यावेळी सैन्यानं त्यांना ऑपरेशन कसं यशस्वी करण्यात आलं याचं प्रेझनटेशन दिलं. भारताच्या धाडसी सैनिकांचा अभिमान वाटत असून त्यांची हिंमत पाहून प्रभावित झाल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.
पठाणकोट इथं दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यातील सर्व अतिरेक्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं. या ऑपरेशनमध्ये भारताचे सात सैनिक शहीद झाले.
Was briefed in great detail on how our forces neutralised such a serious terrorist attack: PM @narendramodi after visiting Pathankot
— PMO India (@PMOIndia) January 9, 2016
Noted with satisfaction the decision-making & its execution, the considerations that went into our tactical response: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 9, 2016
Also noted coordination among various field units. Lauded bravery & determination of our men & women on the ground. They are our pride: PM
— PMO India (@PMOIndia) January 9, 2016