नवी दिल्ली : टीव्हीवर चमकण्यासाठीच विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत असं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे. नोटबंदीच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावावर चर्चा व्हावी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं या मागणीसाठी विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला. यामुळे संतापलेल्या लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांवर हे आरोप केले.
तर राज्यसभेत प्रथम मायावती आणि नंतर गुलाम नबी आझाद यांनी नोटाबंदीवर चर्चेची मागणी लावून धरली. त्यावेळी आझाद यांनी नोटाबंदीनंतर रांगेत मृत्यूमुखी पडलेल्यांनाही आदरांजली वाहण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेलटींनी विरोधकांना धारेवर धरलं.