पंतप्रधान मोदींनी व्हाईट हाऊसलाही टाकलं मागे!

Updated: Jun 26, 2014, 11:35 AM IST
पंतप्रधान मोदींनी व्हाईट हाऊसलाही टाकलं मागे!  title=

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार देशात जरी महागाई, भ्रष्टाचार आणि अन्य काही समस्यांवर तोडगा काढण्याच्या योजना बनवत असतील तरी, मात्र ट्विटरवर नरेंद्र मोदींनी चांगलंच यश मिळवलंय. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर मोदींच्या फॉलोअर्सची संख्या व्हाईट हाऊस पेक्षा जास्त झाली आहे. अमेरिकेच्या ही सरकारला मोदींनी मागे टाकलंय. 

दरवर्षी जगातील सर्व नेत्यांवर ट्विप्लोमॅसी अभ्यास केला जातो. यावेळी मोदी ट्विटरवर फॉलोअर्सची संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावरांच्या नेत्यांमध्ये मोदी चौथ्या स्थानावर आहेत. 

 जागतिक जनसंपर्क आणि कम्युनिकेशन कंपनी बर्सन मासर्टेलरच्या अहवालानुसार, अमेरिकेतील राष्ट्रपती बराक ओबामांना ट्विटरवर जास्त फॉलो केले जातात. त्यांच्यानंतर पॉप फ्रांसिस, इंडोनेशियाई राष्ट्रपती सुसीलो बॅम्बॅंग युद्धोयोनो, त्यानंतर मोदी आणि व्हाईट हाऊसचा नंबर लागतो. 

या अभ्यासादरम्यान सांगण्यात आलं की, मे 2014ला मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर जगातील सर्व नेत्यांमधील फॉलोअर्सच्या बाबतीत मोदी चौथ्या स्थानावर आहेत. ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 49,81,777 आणि त्यांनी व्हाईट 

हाऊसला मागे सोडले असून हाऊसच्या फॉलोअर्सची संख्या 49,80,207 आहे. मोदी आपल्या संदेशासाठी ट्विटरचा एक मजबूत माध्यम म्हणून वापरत करत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.