समान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध

देशात समान नागरी कायदा लागू करण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं स्पष्ट विरोध केला आहे.

Updated: Oct 13, 2016, 04:23 PM IST
समान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध

नवी दिल्ली : देशात समान नागरी कायदा लागू करण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं स्पष्ट विरोध केला आहे. देशाच्या विधी आयोगानं समान नागरी कायद्यासंदर्भात जनतेला मतं विचारली आहेत. त्यावर मत प्रदर्शन करताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं हा विरोध दर्शवला आहे.

समान नागरी कायदा लागू झाला, तर देशातील सामाजिक ऐक्य धोक्यात येईल असंही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं म्हटलं आहे. आज एका पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडण्यात आली.

प्रत्येकाला आपल्या धर्माच्या नियमांनुसार जीवन जगण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे. त्याच आधारावर देशात विविध धर्मांसाठी त्यांच्या धर्मानुसार कायदे करण्यात आलेत. अमेरिकेत प्रत्येक धर्माचा वेगळा कायदा आहे आणि आपला देश या बाबतीत त्याचं अनुकरण का करत नाही, असा प्रश्नही लॉ बोर्डानं विचारला.