नवी दिल्ली : संसदेत पंतप्रधानांची उपस्थिती कमी असल्याच्या तक्रारी वाढत असतांना, नरेंद्र मोदी यांच्या जागी जाऊन सपा नेता मुलायम सिंह यादव यांनी मोदींनी हात जोडून सांगितलं, मेरा नमस्कार तो लेलो, यावर मोदींनीही हसत-हसत अभिवादनाचा स्वीकार केला.
संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवर बसले होते, त्यांच्या बाजूला राजनाथ सिंह देखिल होते.
तेव्हा काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन्ही नेत्यांना हात जोडून माझ्याकडून दोन्ही जणांना नमस्कार असं म्हटलं. यावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी देखिल खरगेंना नमस्कार केला.
पंतप्रधानांनी आज सदनात प्रवेश केला तेव्हा भाजपच्या काही युवा खासदारांशी चर्चा केली. मोदी जागेवर बसणार होते, त्या आधी काही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची आसनाजवळ येऊन भेट घेतली. यात आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांचा देखिल समावेश होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.