हैदराबाद : एमआयएमच्या एका नेत्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. बलात्कार प्रकरणाची माहिती आज पोलिसांनी दिलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना घडली आहे.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून आरोपी पीडित मुलीला त्रास देत होता. गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम निवडणुकीनंतर चर्चेत आला आहे. एमआयएमचे आमदार पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.