करोडपती बनविते ही कौडिया देवी

करोडपती होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र, वाराणसीमध्ये असे एक मंदिर आहे जे भक्तांना करोडपती बनविते. येथे कौडियादेवीला कौडिया चढविल्यावर एवढी संपत्ती प्राप्त होते की करोडपती होण्यास वेळ लागत नाही.

Updated: Sep 11, 2015, 01:36 PM IST
करोडपती बनविते ही कौडिया देवी title=
संग्रहीत

नवी दिल्ली : करोडपती होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र, वाराणसीमध्ये असे एक मंदिर आहे जे भक्तांना करोडपती बनविते. येथे कौडियादेवीला कौडिया चढविल्यावर एवढी संपत्ती प्राप्त होते की करोडपती होण्यास वेळ लागत नाही.

काशी येथील कौडिया माता महालक्ष्मीचे रुप मानले जाते. याला पौराणिक मान्यता आहे. जेव्हा शबरीने श्रीरामला जुठे बेर खाऊ घातले त्यानंतर तिला मोठा पश्चाताप झाला. त्यानंतर तिने भगवान श्रीराम यांची क्षमा मागितली. तेव्हा श्रीरामाने तिला कलियुगमध्ये काशीत राहण्याचा आशीर्वाद दिला. ज्यावेळी कलियुगमध्ये शबरी काशीमध्ये राहण्यास आली त्यावेळी शंकर आणि आई अन्नपूर्णाने हे स्थान दिले. कौडिया मातेचे हे मंदिरही या ठिकाणी आहे. तेव्हापासून भक्त मातेला कौडिया चढविण्यास सुरुवात झाली. पूर्वीच्या जन्मी शबरी ही कलियुगमध्ये कौडिया देवी नावाने प्रसिद्ध आहे.

कोठे आहे हे कौडिया मातेचे मंदिर?
कौडिया मातेचे मंदिर वाराणसीतील खोजवा परिसरात आहे. वाराणसी रेल्वे स्टेशनवरून आपण दुर्गा कुंड येथून रिक्षा पकडू शकता. किंवा रिक्षा तसेच पायीही कौडिया मातेच्या मंदिरापर्यंत जाऊ शकता.
वाराणसी स्टेशनवरुन कौडिया माता मंदिर ६ किलोमीटर दूर आहे.

व्यवसायात नुकसान होत असेल. नवीन काम सुरु करायचे असेल. पैसे मिळाल्यानंतर लगेच खर्च होत असतील तर आपण कौडिया मातेला मंदिरात जाऊन कौडिया चढविल्या तर तुमच्या समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. तसेच आपली आर्थिक तंगी लवकरच संपुष्टात येते, असेही सांगितले जाते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.