गुजरातमध्ये पत्रकाराची हत्या, भाजप नेत्याच्या मुलावर आरोप

गुजरातमध्ये एका पत्रकाराची हत्या झाली आहे, हत्येचा आरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुलावर आहे.  जुनागड येथील जयहिंद वृत्तपत्रात ब्यूरो चीफ किशोर दवे यांची त्यांच्या ऑफिसमध्ये हत्या करण्यात आली आहे.

Updated: Aug 23, 2016, 01:31 PM IST
गुजरातमध्ये पत्रकाराची हत्या, भाजप नेत्याच्या मुलावर आरोप title=

जुनागड : गुजरातमध्ये एका पत्रकाराची हत्या झाली आहे, हत्येचा आरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुलावर आहे.  जुनागड येथील जयहिंद वृत्तपत्रात ब्यूरो चीफ किशोर दवे यांची त्यांच्या ऑफिसमध्ये हत्या करण्यात आली आहे.

पत्रकार किशोर दवे यांच्या हत्येचा आरोप भावेश सूरज याच्यावर आहे, भावेश सूरज हा भाजपचे ज्येष्ठ नेते रतिलाल सूरज यांचा मुलगा आहे. रतिलाल सूरज हे नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात कृषीमंत्री होते.

किशोर यांच्या ऑफिसमध्ये रात्री ९ वाजेच्या सुमारास गुंडांनी सपासप वार करून त्यांची हत्या केली, किशोर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान किशोर दवे यांच्या भावाने या हत्येचा आरोप भावेश सूरजवर केला आहे.

किशोर दवे यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, रतिलाल यांचा मुलगा भावेश याचा किशोर यांच्यावर राग होता, कारण एका वर्षापूर्वी भावेशवर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता, याविषयी त्या महिलेने पत्रकार परिषद देखील घेतली होती. महिलेने केलेले आरोप किशोर दवे यांनी दैनिकात प्रकाशित केले होते.

मात्र यानंतर किशोर दवे यांना सतत धमक्या दिल्या जात होत्या, याविषयी त्यांनी पोलिसात तक्रार देखील केली होती. तसेच भावेशने किशोर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल केला होता, असं देखील किशोर दवे यांच्या भावाने सांगितलंय. तसेच किशोरची हत्या याच प्रकरणातून झाल्याचं किशोरच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.