धक्कादायक : नेहरू सरकारनं २० वर्ष ठेवली सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबावर पाळत

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. गुप्त सूचीतून हटवण्यात आलेल्या गुप्तचर विभागाच्या दोन फाईल्समधून हा खुलासा झाला आहे.

Updated: Apr 10, 2015, 12:49 PM IST
धक्कादायक : नेहरू सरकारनं २० वर्ष ठेवली सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबावर पाळत title=

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. गुप्त सूचीतून हटवण्यात आलेल्या गुप्तचर विभागाच्या दोन फाईल्समधून हा खुलासा झाला आहे.

फाईल्समधून मिळालेल्या माहितीनुसार १९४८ ते १९६८ या काळात बोस यांच्या कुटुंबावर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. या २० वर्षांच्या कालावधील १६ वर्ष नेहरू भारताचे पंतप्रधान होते आणि गुप्तचर यंत्रणा त्यांच्याच अंतर्गत काम करत होती. 

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार बोस यांच्या कोलकातामधील वुडबर्न पार्क आणि ३८/२ एल्गिन रोड येथील घरांवर नजर ठेवण्यात आली होती. तसंच सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे शिशिर बोस आणि अमेयनाथ बोस यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जात होतं..

बोस यांच्या घरावर नजर का ठेवण्यात आली होती हे स्पष्ट झालेलं नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.