अवकाश कवेत घ्यायला ‘जीएसएलव्ही’ सज्ज

सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर अवकाशात भरारी घेण्यासाठी ‘जीएसएलव्ही डी-५’ सज्ज झालंय. आज संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून जीएसएलव्ही ५चं उड्डाण होणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 19, 2013, 11:13 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, श्रीहरीकोटा
सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर अवकाशात भरारी घेण्यासाठी ‘जीएसएलव्ही डी-५’ सज्ज झालंय. आज संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून जीएसएलव्ही ५चं उड्डाण होणार आहे.
जीएसएलव्ही-डी-५ प्रक्षेपकाद्वारं दूरसंचार उपग्रह असलेला जीएसएटी (जीसॅट)-14 अवकाशात सोडला जाणार आहे. या मोहिमेत प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या जीएसटी-१४ या उपग्रहाचं वजन एक हजार नऊशे ब्याऐंशी किलो इतकं आहे. उपग्रह दूरसंचारासाठी वापरण्यात येणार आहे.
हा उपग्रह अवकाश सोडण्यासाठी वापण्यात येणाऱ्या जीएसएलव्ही प्रक्षेपकात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आलाय. याआधी १५ एप्रिल २०१० रोजी जीएसएलव्ही-डी-३ या प्रक्षेपकात भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आला होता. मात्र हा प्रयोग अयशस्वी ठरला होता.
त्यानंतर डिसेंबर २०१०मध्ये रशियाकडून मागवलेल्या क्रायोजेनिक इंजिनचा उपयोग करण्यात आला. मात्र तोही असफल ठरला. अखेर या सगळ्यांवर मात करुन आज जीएसएलव्ही- डी-५ अवकाशात झेपावणार असल्यानं भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोसाठी हे उड्डाण प्रतिष्ठेचं आहे. ही झेप यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन, रशिया आणि फ्रान्सच्या बरोबरीनं अवकाशात भारताला मानाचं स्थान मिळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.