नवी दिल्ली : मणिपूरच्या एका न्यायालयानं इरोम शर्मिला यांना न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्याचे आदेश दिलेत.
मंगळवारी, मणिपूरच्या एका सत्र न्यायालयात के एच मणि आणि वाय देवदत्ता यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश गुनेश्वर शर्मा यांनी हे आदेश दिलेत. यावेळी, ‘आत्महत्येचा प्रयत्न करण्याची इच्छा असल्याचा आरोप इरोम शर्मिला यांच्यावर सिद्ध होत नाही’ असं न्यायालयानं म्हटलंय.
राज्य सरकार इरोम इर्मिला यांच्या तब्येतीसाठी योग्य ते उपाय करू शकतात, असं देखील न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलंय.
सशस्त्र बल विशेषाधिकार कायदा (आफ्स्पा) हटविण्यात यावा, या मागणीसाठी जवळपास 14 वर्षांपासून इरोम शर्मिला यांनी अन्नत्याग केलाय. गेल्या 13 वर्षांपासून त्या मणिपूरच्या एका हॉस्पीटलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.