मुंबई : ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आयकर विभागाने काळ्या पैशांवर नजर ठेवून आहे. आयकर विभागाने दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.
सध्या कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार काळ्या पैशांच्या पार्श्वभूमिवर ज्यांच्यावर शंका होती अशा लोकांविरोधात आयकर विभागाने छापे टाकत ही धडक कारवाई केली आहे. झवेरी बाजारात देखील आयकर विभागाने छापे टाकल्याचं कळतंय.
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी रात्री अचानक ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केल्याने देशभरात खळबळ माजली. काळा पैसा साठवून ठेवलेल्य़ा लोकांना याचा चांगलाच धक्का बसला आहे. काही दिवसांमध्ये जर आणखी काही धडक कारवाया झाल्या तर आर्श्चय वाटायला नको.