हैदराबाद: तेलंगणमधील जनतेची सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या पाहणीसाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून वाद सुरू असताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या निर्णयाचं समर्थन करत 'अन्याय' रोखण्यासाठी आपण 'हिटलर' बनू शकतो, असं वक्तव्य केलं.
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. 'कोणी म्हणतात केसीआर हिटलर आहे, कोणी म्हणतं मी हुकूमशहा आहे, मी तर म्हणतो चोर, भ्रष्टाचारी लोकांसाठी मी खरंच हिटलर बनू शकतो’.
‘अन्याय थांबवण्यासाठी हिटलर बनण्यात मला कोणताही कमीपणा वा लाज वाटत नाही', असं सांगत त्यांनी आपल्या निर्णयाचं समर्थनच केलं. राज्यातील योग्य आणि गरजू नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचव्यात हाच या सर्वेक्षणाचा उद्देश असल्याचं ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.