सोन्याच्या दरात वाढ

सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात शनिवारी वाढ पाहायला मिळाली. लग्नसराईच्या मोसमामुळे मागणीत वाढ होऊ लागल्याने स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या दरात शनिवारी ४४० रुपयांची वाढ होत ते पुन्हा एकदा प्रति १० ग्रॅमसाठी २६ हजार रुपयांवर येऊन ठेपले. चांदीच्या किंमतीततही ८५० रुपयांची वाढ होत ती प्रति किलो ३४ हजार ९५० रुपये झाली. 

Updated: Dec 6, 2015, 01:28 PM IST
सोन्याच्या दरात वाढ title=

नवी दिल्ली : सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात शनिवारी वाढ पाहायला मिळाली. लग्नसराईच्या मोसमामुळे मागणीत वाढ होऊ लागल्याने स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या दरात शनिवारी ४४० रुपयांची वाढ होत ते पुन्हा एकदा प्रति १० ग्रॅमसाठी २६ हजार रुपयांवर येऊन ठेपले. चांदीच्या किंमतीततही ८५० रुपयांची वाढ होत ती प्रति किलो ३४ हजार ९५० रुपये झाली. 

जागतिक बाजारात सोन्याच्या दरांनी तीन आठवड्यातील उच्चांकी स्तर गाठला. तर स्थानिक बाजारांत लग्नसराईच्या मोसमामुळे आता मागणी वाढू लागलीये. शनिवारी न्यूयॉर्क बाजारातही सोन्याच्या दरात २.३३ टक्के वाढ होत ते एक हजार ८६.३० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. 

१६ नोव्हेंबरनंतर सोन्याच्या दरात प्रथमच इतकी वाढ झाली. शुक्रवारी चांदीच्या किंमतीत ३.३८ टक्क्यांची वाढ होत १४.५५ प्रति डॉलर औंस इतके होते. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे २६ हजार आणि २५ हजार ८५० रुपये होते. 

gold rate today in mumbai

22-Carat 24-Carat Change (%)
Current Price 24790 26513.37 -0.92%
Previous Price 25020 26759.36

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.