ग्रीनपीस इंडियाची मान्यता रद्द

ग्रीनपीस इंडियाची मान्यता तामिळनाडू रजिस्ट्रार ऑफ सोसायटीने रद्द केली आहे. याबाबत रजिस्ट्रार कार्यालयाने तसा  आदेश ४ नोव्हेंबर रोजी काढला होता. तो आज शुक्रवारी ग्रीनपीसला मिळाला.

Updated: Nov 6, 2015, 10:57 PM IST

नवी दिल्ली : ग्रीनपीस इंडियाची मान्यता तामिळनाडू रजिस्ट्रार ऑफ सोसायटीने रद्द केली आहे. याबाबत रजिस्ट्रार कार्यालयाने तसा  आदेश ४ नोव्हेंबर रोजी काढला होता. तो आज शुक्रवारी ग्रीनपीसला मिळाला.

ग्रीनपीस इंडियाची एनजीओ किंवा अशासकीय संस्था म्हणून तामिळनाडू रजिस्ट्रार ऑफ सोसायटीकडे नोंदणी करण्यात आली होती. ही संस्था वायू प्रदूषण, नैसर्गिक संसाधने या क्षेत्रात कार्यरत आहे. 

ग्रीनपीसची बाजू न ऐकता ही कारवाई करण्यात आल्याचे आणि या संदर्भातला मद्रास उच्च न्यायालयचा आदेशही धुडकावण्यात आल्याची प्रतिक्रिया ग्रीनपीसने व्यक्त केलेय.
आमची कायदेशीर बाजू भक्कम आहे आणि आमचा न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे , ग्रीनपीसने म्हटलंय. केंद्र सरकारच्या गृहखात्याच्या आदेशानुसार रजिस्ट्रार कार्यालयाने ही कारवाई केली आहे. 

मान्यता रद्द करण्याची कारवाई म्हणजे भाषण स्वातंत्र्यावर गदा असल्याची प्रतिक्रिया संस्थेने दिली आहे. ग्रीनपीस या आदेशाविरोधात मद्रास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे ग्रीनपीसने म्हटलेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.