धक्कादायक : भावाच्या डोळ्यासमोर बहिणीचा गँगरेप

 भावाच्या डोळ्यासमोर त्याच्या बहिणीची अब्रू लुढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बिजनौरमध्ये घडला. आपल्या भावासोबत बहिणी माहेरी येत होती. रस्त्यात काही गुंडांनी त्यांना अडविले, लुटले आणि नंतर बहिणीसोबत गँगरेप केला. दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Updated: Oct 7, 2015, 02:28 PM IST
धक्कादायक : भावाच्या डोळ्यासमोर बहिणीचा गँगरेप title=

बिजनौर :  भावाच्या डोळ्यासमोर त्याच्या बहिणीची अब्रू लुढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बिजनौरमध्ये घडला. आपल्या भावासोबत बहिणी माहेरी येत होती. रस्त्यात काही गुंडांनी त्यांना अडविले, लुटले आणि नंतर बहिणीसोबत गँगरेप केला. दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मंडावर ठाण्याचजवळी एका गावातील महिलेचा निकाह रायपूरच्या सादात गावात झाला होता. सोमवारी सायंकाळी भाऊ आपल्या बहिणीसह बाइकवरून जात असताना त्याला दोन बाईकवर स्वार असलेल्या चार बदमाशांनी अडविले. 

पीडितांनी सांगितले की, गुंडांनी त्यांना लुटले, जबर मारहाण केली. महिलेला गावठी बंदुक दाखवून शेतात घेऊन गेले आणि तिचा गँगरेप केला. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.