पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना निशाणा साधला. मी सैतान असलो तर, ते ब्रम्हपिशाच्च आहेत, असा लालूप्रसाद यांनी मोदींवर पलटवार केलाय.
अधिक वाचा : चिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश
मोदींच्या टोमण्यानंतर लालूप्रसाद जाम चिडलेत. मोदी ब्रह्मपिशाच्च असल्याने ते पळवून लावण्यासाठी मोहरी आणि मिर्चीची धुरी करुन त्यांना पळवून लावा, असे आवाहन लालूंनी केले. बिहार निवडणुकीचा प्रचार आता थेट बिहारी स्टाईलनं सुरू झालाय. यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही मागे राहिलेले नाहीत.
अधिक वाचा : नितीश कुमार ‘अहंकारी’ : नरेंद्र मोदी
लालूंचा उल्लेख सैतान असा केल्यानंतर आता लालूंनी मोदींवर पलटवार केलाय. आपण सैतान असलो तर मोदी ब्रह्मपिशाच्च आहेत, अशा शब्दांत लालूंनी मोदींवर तोफ डागली. दुसरीकडे मोदींच्या विधानाबाबत निवड़णूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं राष्ट्रीय जनता दलानं म्हटलंय. त्यांना बिहारमध्ये सभा घेऊ देऊ नये, अशी मागणीही यावेळी केलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.