मेल्याचे भासवून ८ वर्षांच्या मुलीने बलात्काऱ्याच्या तावडीतून केली सुटका

राजधानीत बलात्काऱ्याच्या घटना थांबविण्याचे नाव घेत नाही. दिवसागणित या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका ८ वर्षांच्या मुलीने बलात्काऱ्याच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी मृत झाल्याचे भासवून स्वत:ची सुटका करुन घेतली.

Updated: Jun 1, 2016, 03:27 PM IST
मेल्याचे भासवून ८ वर्षांच्या मुलीने बलात्काऱ्याच्या तावडीतून केली सुटका title=
संग्रहित

नवी दिल्ली : राजधानीत बलात्काऱ्याच्या घटना थांबविण्याचे नाव घेत नाही. दिवसागणित या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका ८ वर्षांच्या मुलीने बलात्काऱ्याच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी मृत झाल्याचे भासवून स्वत:ची सुटका करुन घेतली.

पिडित चिमुरडी दिल्लीच्या किरारी परिसरात रहाते. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीला घराबाहेर कॉटवर झोपली होती. झोपेतच असताना तिचे अपहरण केले. 
 
दरम्यान, तिला निर्जनस्थळी जाग आल्याने तिने आरडाओरडा केला. त्याचवेळी आरोपीने तिचे तोंड दाबले. आरोपीने पीडित तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपी आपल्याला ठार मारेल, या भीतीने तिने  कोणतीही हालचाल न करता निपचित पडून राहिली. जेणेकरुन आरोपीला मृत्यू झाला आहे असे वाटावे. 
 
मुलीचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपी तिथून सटकला. त्यानंतर पीडित मुलगीन पळत घर गाठले आणि हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. दरम्यान, मुलगी पळत असल्याचे पाहताच आरोपींनी तिचा पाठलाग केला. पिडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.