माल्ल्याचं कर्ज 'एसबीआय'च्या बुडीत खात्यात जमा

एकीकडे देशात नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक रांगामध्ये तात्कळत आहेत... तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईनं घेतलेलं १२०१ कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलंय. 

Updated: Nov 16, 2016, 11:08 AM IST
माल्ल्याचं कर्ज 'एसबीआय'च्या बुडीत खात्यात जमा title=

मुंबई : एकीकडे देशात नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक रांगामध्ये तात्कळत आहेत... तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँकेनं विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईनं घेतलेलं १२०१ कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात जमा केलंय. 

३० जून २०१६ रोजी हे कर्ज बुडित खात्यात जमा करण्यात आलंय. बँकिंगच्या क्षेत्रात या प्रक्रियेला 'राईट ऑफ' करणे असं म्हटलं जातं.

एसबीआयनं जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत एकूण ४८ हजार कोटींची कर्ज 'राईट ऑफ' केली. त्यात विजय मल्लांचं नाव सर्वात वर आहे. 


कर्जबुडव्यांची यादी (सौ. डीएनए)

'झी माडिया'चं सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'नं प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार किंगफिशर एअरलाईन, केएस ऑईल, सुर्या फार्मास्युटिकल, गेट इंजिनिअरिंग कंन्स्ट्रक्शन आणि साई इन्फो सिस्टिम अशी पहिल्या पाच कर्ज बुडव्या कंपन्यांची नावं आहेत.