www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाची लवकरच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७ डिसेंबर रोजी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान पदासाठी राहुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं जावं, अशी इच्छा आहे... आणि आता या गोष्टीची केवळ अधिकृतरित्या घोषणा होणं बाकी उरलंय.
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत दणकून पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू झालंय. तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर लवकरच पंतप्रधानपदाच्या उमेद्वाराची घोषणा करावी, असं नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, भाजपकडून काही महिने अगोदरच नरेंद्र मोदी यांच्या नावाची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आलीय.
चार राज्यांत झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसची परिस्थिती बिकट असल्याचं उघड झालीय. दरम्यन, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्वत:ला अतिसक्रिय करून राहुल गांधी यांची जबाबदारी कमी करायचं नाही. त्यावेळी पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरा योग्य उमेदवार असूच शकत नाही, असं म्हटलं जातंय. यापूर्वी, काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नंदन नीलकेणी यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.