देहराडून: उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्याची घटना घडली आहे. आज संध्याकाळी ही ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळं रुद्रप्रयाग-बद्रीनाथ हा मार्ग ठप्प झाला आहे.
या ढगफुटीनंतर प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या ढगफुटीनंतर कोणतंही अनुचित वृत्त समोर आलेलं नाही. मात्र या घटनेमुळं 2013च्या त्या महाप्रलयाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.