चेन्नई : महाराष्ट्राला दुष्काळाचा तडाखा बसत असताना, चेन्नईमधल्या पावसानं मात्र यंदा १०० वर्षांमधला विक्रम मोडलाय. गेल्या आठवड्यात शहरामध्ये हाहाःकार माजवल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा पावसानं थैमान घालायला सुरूवात केली आहे. यामुळे पुरातून सावरत असलेल्या चेन्नईतल्या सखल भागांना मात्र या पावसानं पुन्हा एकदा तडाखा दिला.
शहरातल्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचलंय. किनारपट्टी भागात घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे अतोनात हाल होतायत. सोमवारच्या पावसामुळे शहरातलं तापमानही कमालीचं खाली गेलंय.
नोव्हेंबर महिन्यात तब्बल 119.73 सेंटीमीटर पावसाची नोंद झालीये. 1918 सालचा 108.8 सेंटीमीटर पावसाचा विक्रम या पावसानं मोडीत काढलाय. अर्थात, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, म्हणजे 1943 ते 1951 दरम्यान वेधशाळा बंद होती. त्यामुळे या काळातला रेकॉर्ड अस्तित्वात नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.