www.24taas.com , वृत्तसंस्था, गुलबर्ग
विषाची शेती करणाऱ्या आणि विभाजनाचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती सत्ता देऊ नका, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केलंय. कर्नाटकमधल्या गुलबर्ग्यात झालेल्या रॅलीमध्ये त्या बोलत होत्या. नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांनी मोदींवर आणि भाजपवर कडाडून टीका केली.
विषाची शेती करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. आम्ही त्यांचा जो उद्देश आहे. तो कधीही साध्य करू देणार नाही, असे सांगत सोनिया गांधी म्हणाल्यात भाजप जातीय हिंसा भडकावण्याचा काम करीत आहे. यातूनच त्यांना राजकारण करीत आहे.
नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये प्रामुख्याने सोनिया गांधी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी निशाण्यावर असतात. असे असताना सोनिया गांधी यांनी आपला रोख साधण्याचा प्रयत्न करताना सांगितले, जे सातत्याने आपलाच ढोल बजावत आहेत त्यांनी विचारू इच्छीते जे देशासाठी असे करीत आहेत त्याची जरूरी आहे का, अजिबात नाही. राहुल म्हणालेत, भाजपचा उद्देश केवळ सत्ता हस्तगत करण्याचा आहे. त्यांचे काँग्रेसविरोधात केवळ षडयंत्र आहे. यावेळी सोनिया यांनी अनेक लोकोपयोगी योजनांचा आढावा घेतला.
दरम्यान, काँग्रेसच्या या टीकेचा काहीही फरक पडणार नाही. या आधी सोनिया गांधी यांनी मोदी यांना मौत का सौदागर, असं म्हटल आहे. त्यावेळी २००७ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हार पत्करावी लागली होती, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राजीव प्रताप रूडी यांनी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.