देशाच्या संवेदनशील सीमा होणार हायटेक

जम्‍मू-कश्‍मीरमधील उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काही उपाय योजना करण्यास सुरूवात केली आहे. 

Updated: Sep 26, 2016, 05:39 PM IST
देशाच्या संवेदनशील सीमा होणार हायटेक

नवी  दिल्‍ली : जम्‍मू-कश्‍मीरमधील उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काही उपाय योजना करण्यास सुरूवात केली आहे. 

या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमा अधिक हायटेक करण्यात येणार आहेत, यासाठी गृहमंत्री राजनाख सिंह यांनी सुरक्षा एजन्सीना आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉर्डरवर लेजर वॉल लावली जाणार आहे, आणि फेसिंगलाही अधिक हायटेक केलं जाणार आहे. गृहमंत्रीराजनाथ सिंह यांनी मधुकर गुप्ता यांचा रिपोर्ट लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 

सीमा सुरक्षेसाठी मधुकर गुप्ता समिती स्थापन करण्यात आली होती. पठाणकोठ एअरबेस हल्ल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती.