भिकारी वेशात राज्यात दहशतवादी हल्ल्याचा धोका

दहशतवादी हल्ल्याचा धोका, भिकारी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या वेशात दहशतवाद्यांकडून रेल्वे स्थानक आणि रुळ परिसरात घातपात घडविण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 23, 2017, 08:42 AM IST
भिकारी वेशात राज्यात दहशतवादी हल्ल्याचा धोका title=

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्याचा धोका, भिकारी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या वेशात दहशतवाद्यांकडून रेल्वे स्थानक आणि रुळ परिसरात घातपात घडविण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे.

भिकारी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या शात दहशतवाद्यांकडून रेल्वे स्थानक आणि रुळ परिसरात  घातपात घडविण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने  महाराष्ट्र पोलिसांना पत्र पाठवून दिलीये. त्यामुळे देशातील प्रमुख स्थानक असलेल्या मनमाड रेल्वे  स्थानकावरही  सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. 

मनमाड रेल्वे स्थानकाची सुरक्षा  व्यवस्था वाढविण्यात आलीये.. रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस तसेच शहर पोलिसांच्या समन्वयातून रेल्वे स्थानक आणि परिसरात  कसून तपासणी करण्यात येत आहे. 

तर  स्टेशन तसेच ट्रॅकवर पेट्रोलिंग करण्यात येत आहे. भिकारी आणि अनोखळी  विक्रेत्यांवर  करडी नजर ठेवण्यात येत आहे. श्वान पथकाकडून  रेल्वे स्थानक परिसर व  प्रवाशी गाड्यांची  तपासणी करण्यात येत आहे.