नवी दिल्ली : मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबडेकर प्रकरणी राज्य सरकार जबाबदार असल्याचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हा प्रश्न उपस्थित करताना म्हटले. राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारला केले लक्ष्य केल्याने भाजप-शिवसेना वाद उफाळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने योग्यरित्या भूमिका मांडली असती तर वाद झाला नसता. आंबडेकर भवन इमारत पाडतेवेळी आयुक्तांचीच महत्त्वाची भूमिका असते. आयुक्तांना राज्य सरकार नियुक्त करते. त्यांनी राज्य सरकारला योग्य माहिती देऊन प्रश्न सोडवायला पाहीजे होता, मात्र तसे काहीही झालेले नाही. त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय, असे राहुल शेवाळे म्हणालेत.
कारवाई वेळी मी मुंबईत नव्हतो. आल्यानंतर आपल्या नेत्यांना सांगितले की याबद्दल संसदेत भूमिका मांडली आहे. शिवसेनेने भूमिका लोकभावनेचा आदर करून मांडली आहे. आंबेडकर भवन येथे मोठे भवन निर्माण व्हावे. ग्रामीण भागातील मुलींसाठी आधार आहे. जास्त एफएसआय वापरून इमारत बांधता येईल. मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे दुर्देवाने घटना घडली असती आणि हानी झाली असती तर जबाबदारी कोणी घेतली असती का, असा प्रश्न राहुल शेवाळे यांनी यावेळी उपस्थित केला.
आंबेडकर भवनला भेट दिली होती. ही इमारत मोडकळीस आली होती. दुरूस्ती किंवा पुर्नबांधणी करणे गरजेचे होते. पुर्नबांधणी करायची असेल तर राज्य व केंद्र सरकारने करावी, असे लोकसभेत राहुल शेवाळे सांगितले. वाद मिटवून पुन्हा आंबेडकर भवन प्रस्थापित करण्याची विनंती केली आहे. कारवाई करताना सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे होते, यावेळी शेवाळे यांनी सांगून लक्ष वेधले.