नवी दिल्ली : जिओच्या मोफत कॉल्सच्या त्सुनामीमुळे विविध नेटवर्कवर कसलाही वाईट परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करावी, यासाठी एअरटेलने ट्रायकडे धाव घेतली आहे.
याविषयी एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि रिलाइन्स जिओच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी ट्रायसोबत बैठक झाली. या बैठकीत रिलायन्स जिओमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये इंटरकनेक्ट पॉईंटसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चा झाली.
रिलायन्स जिओने धडाक्यात एण्ट्री केल्यामुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे एअरटेलने थेट टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायकडे मदतीची याचना केली आहे.