www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जर तुम्ही दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत असाल, तर जरा सावध राहण्याची गरज आहे. कारण दिल्लीत जानेवारी आणि मार्च महिन्यादरम्यान पकडण्यात आलेल्या खिसेकापूंमध्ये 94 टक्के महिला होत्या.
दिल्ली मेट्रोची नोडल सुरक्षा एजन्सी सीआयएसएफने 2014च्या जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यानचे आकडे जमा केले आहेत. मेट्रोत 126 खिसेकापू पकडण्यात आले, त्यापैकी 118 महिला होत्या.
एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महिला खिसेकापूंची एक गँग आहे. या महिला आपल्या सोबत आपल्या लहान मुलांना घेऊन येतात आणि गर्दीत मिसळतात, यामुळे यांच्यावर कुणीही संशय व्यक्त करत नाही.
महत्वाचं म्हणजे या महिला महिला प्रवाशांनाच लक्ष करतात. राजनाधी दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, नोएडा आणि गाझियाबादमधील 134 मेट्रो स्टेशनवरील प्रवाशांना चौकस राहण्याची गरज असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.