गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश

पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

PTI | Updated: Apr 29, 2016, 02:00 PM IST
गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश

अहमदाबाद : पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी लाभ 

गुजरातमधील सामान्य वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या नव्या आरक्षणामुळे पाटीदार समाजासह ब्राम्हण, क्षत्रिय व लोहना समाजासह इतर सामान्य वर्गातील वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. 

६ लाखांची अट

गुजरात दिनाच्या दिवशी म्हणजे एक मे रोजी आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी आहे ते सर्व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार असल्याचे सरकारने जाहीर केलेय.

असाही सूड घेतला...

दरम्यान, गुजरातमध्ये पाटीदार समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले. यामुळे या समाजाला याचा लाभ घेता येणार आहे. नवीन आरक्षणानुसार एसी, एसटी, ओबीसी समाजाला ४९ टक्के मिळणार आहे.