खूप राग येणं स्वास्थ्यासाठी चांगलं की वाईट?

अती क्रोध तन आणि मनासाठी नुकसानदायक ठरतो, असं म्हटलं जातं. परंतु, शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संस्कृतींमध्ये राग येणं हे वाईट नाही तर चांगल्या स्वास्थ्याचं लक्षण आहे. अभ्यासानुसार, अत्याधिक क्रोधाला जपानी लोक चांगल्या जैविक स्वास्थ्याशी जोडून पाहतात.

Updated: Jan 10, 2015, 07:57 AM IST
खूप राग येणं स्वास्थ्यासाठी चांगलं की वाईट? title=

न्यूयॉर्क : अती क्रोध तन आणि मनासाठी नुकसानदायक ठरतो, असं म्हटलं जातं. परंतु, शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संस्कृतींमध्ये राग येणं हे वाईट नाही तर चांगल्या स्वास्थ्याचं लक्षण आहे. अभ्यासानुसार, अत्याधिक क्रोधाला जपानी लोक चांगल्या जैविक स्वास्थ्याशी जोडून पाहतात.

'यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन'चे मनोविज्ञानी शिनोबु कितायामा यांच्यानुसार, क्रोधाला हानिकारक स्वास्थ्याशी जोडू पाहणं सहसा पश्चिमी संस्कृतीचा हिस्सा आहे. इथं रागाला निराशा, निर्धता, निम्न जीवन स्तर आणि स्वास्थ्याला हानीकारक ठरू पाहणाऱ्या सगळ्याच कारणांशी जोडून पाहिलं जातं. 

शोधकर्त्यांनी अमेरिका आमि जपानमध्ये एकत्र केलेल्या आकड्यांचं आकलन केलं. तेव्हा त्यांच्या चांगल्या स्वास्थ्याच्या स्तराला मापण्यासाठी उत्तेजना आणि हृदयाशी जोडलेल्या प्रक्रियेचा अभ्यास केला. ज्यांना यापूर्वी केल्या गेलेल्या शोधांमध्ये क्रोधाच्या भावनेला जोडून पाहिलं जातं. 

अभ्यासादरम्यान असं लक्षात आलं की अमेरिकेत अत्याधिक क्रोधाला जैविक स्वास्थ्यासाठी हानिकारक मानलं जातं, तर दुसरीकडे जपानमध्ये अत्याधिक क्रोधाला जैविक स्वास्थ्याच्या धोक्याच्या स्तराला कमी करणं आणि चांगल्या स्वास्थ्याची निशाणी मानलं जातं. .

कितायामा यांच्या म्हणण्यानुसार, सामाजिक-सांस्कृतिक बदलही जैविक प्रक्रियेच्या बाबतीत महत्त्वपूर्ण रुपात परिणामकारक ठरतात, असंच या अध्ययनातून दिसून येतंय. हा अभ्यास जर्नल सायकोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.