मुंबई : विवाहाच्या वेळी मुलगा आणि मुलींच्या वयांत अंतर असायला हवं... मुलगा मुलीपेक्षा मोठाच असायला हवा... हे विचार आता मागे पडत चाललेत. आत्ताची तरुणाई रिलेशनशीपमध्ये अडकताना या गोष्टींचा फारसा विचार करत नाही... मानसिक आणि आर्थिक स्थैर्याचा जास्तीत जास्त विचार यामागे असतो.
यावेळी, मुलं आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या मुलींकडे जास्त आकर्षित होताना दिसतात. आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या मुलींना आपल्या जीवनाचा पार्टनर त्यांना बनवायचं असतं... यामागेही मनोवैज्ञानिक कारण असल्याचं सांगितलं जातं. प्रामुख्यानं खालील दहा विचार यामागे मुलांच्या मनात असतात...
- तरुण मुलांना एखादी जबाबदार व्यक्ती आपली सहचारिणी म्हणून आवडते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापेक्षा मोठ्या मुलींकडे त्यांना या नजरेनं पाहता येतं.
- वयानं मोठ्या असलेल्या मुली अविवाहीत जरी असतील तरी त्यामागे कौटुंबिक आणि आर्थिक कारणंही असू शकतात... या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या मुलींमध्ये जबरदस्त आत्मविश्वास जाणवतो. त्यांचा हाच आत्मविश्वास त्यांचा प्लस पॉईंट बनतो.
- वयानं मोठ्या महिला नोकरी करणाऱ्या असतील तर त्या जास्तीत जास्त स्वातंत्र्याचा अनुभव घेतात. त्या आत्मनिर्भर असतात. त्यामुळे अशा महिलांना आपला लाईफ पार्टनर असतील तर मुलांच्या आयुष्यातही फार बदल होत नाहीत. किंवा त्यांना आपल्या पत्नीबद्दल फारशी चिंता भेडसावत नाही. त्यामुळे ते आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकतात.
- वयानं मोठ्या असलेल्या महिला समजूतदार असतात. त्या आपले नातेसंबंध, कर्तव्य आणि नोकरीमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतात. आपले नातेही त्या याच प्रामाणिकपणे जपतात.
- वयानं मोठ्या महलांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सापेक्ष असतो... त्यांचा नातेसंबंधांकडे, मग ते शारीरिक असो किंवा मानसिक... बघण्याचा दृष्टीकोन ठरलेला असतो. त्या एखादी जोखीम पत्करत असतील तर त्यांचे परिणाम सहन करण्याची क्षमताही त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्या स्वत:ला सहज सावरू शकतात. अशा महिलांकडे पुरुष लवकर आकर्षित होतात.
- ज्याप्रमाणे महिला आपल्या नवऱ्यात आपल्या वडिलांना पाहण्याचा प्रयत्न करतात... त्याचप्रमाणे पुरुषही आपल्या पत्नीत आपल्या आईला पाहण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या जबाबदार महिलेकडे त्यांना हा मानसिक आधार मिळू शकतो.
- वयाप्रमाणे महिलांमध्ये मॅच्युरिटी वाढत असते... त्या आपल्या आयुष्यात व्यवस्थित सेटही झालेल्या असतात. त्यांचं करिअर त्या प्रभावीपणे सांभाळत असतात. अशा महिलांकडेही पुरुष लवकर आकर्षित होतात.