गरोदर महिलांनी कशी घ्यावी काळजी?

जेव्हा स्त्री गर्भव्यस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.  

Updated: Jul 4, 2014, 04:35 PM IST
गरोदर महिलांनी कशी घ्यावी काळजी? title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : जेव्हा स्त्री गर्भव्यस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.  

गरोदर असताना फळ आणि ज्यूस खूप फायदेशीर असतात. फळे खाल्ल्याने प्रोटीन, कॅल्शियम आणि सिलिकॉन मिळते. तसेच ज्यूस घेतल्याने शरीर ताजेतवाण होते. मात्र ज्यूस पिताना लक्ष ठेवावं की ते ज्यूस ताज्या फळांपासून बनलेलं असावं. ट्रेटा पॅक ज्यूस पिऊ नये. गरोदर महिलांना नाश्तांच्या वेळी दूध आणि डेअरी प्रोडक्टांचा ही वापर करावा.  

तसेच नाश्ताला अंडे किंवा ऑम्लेट ही त्या घेऊ शकतात. पालकसोबत ऑम्लेट खाल्लास ते खूप फायदेशीर असते. यातून एकूण 41 कॅलरीसोबत लोह, फॉस्परस, अॅसिड आणि कॅल्शियम मिळते. 

संपूर्ण आहार म्हणजे ओटचे जाडे भरडे पीठ, मका, डाळी, ब्राऊन तांदूळ देखील गरोदरपणी लाभदायक आहे. त्यात व्हिटॅमिन, प्रथिने, कॅल्शियम आणि फायबर असते जे गरोदर महिलांसाठी जरुरी आहे. 

गरोदर महिलांनी भरपूर पाणी प्यावे. फिल्टर्ड पाण्यांचा उपयोग करावा. फिल्टर्ड पाणी नसल्यास पाणी उकळून प्यावे. बाहेर असताना नेहमी फिल्टर्डयुक्त किंवा बिस्लरी पाणी  प्यावे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.