www.24taas.com , झी मीडिया,लंडन
सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत स्तनपान करणाऱ्या महिलांना स्तन कॅन्सरचा धोका कमी होता, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ज्या माता सिगारेट ओढत असतील त्यांच्याबाबत ही बाब लागू होत नाही.
ग्रेनेडा विद्यापीठाच्यावतीने आणि वेबसाईट `फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके` यांच्या सहाय्याने सर्वे करण्यात आला. अभ्यास करताना १९ ते ९१ वर्षांच्या ५०४ महिलांच विचार करण्यात आला. या महिलांना स्तनाचा कॅन्सर झाला होता. २००४ ते २००९ दरम्यान उपचार घेणाऱ्या महिलांचा अभ्यास करण्यात आला.
ज्या महिलांनी आपल्या बाळाला स्तनपान केले नव्हते. तसेच स्तनपान करणाऱ्या माता यांचा अभ्यास केला गेला. त्यातून असे स्पष्ट झाले की १० ट्क्के महिलांना कॅन्सर झाला होता. तर धुम्रपान न करताना सहा महिने स्तनपान केले तर आईला आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगले असते. स्तपान केले तर स्तन कॅन्सरचा धोटा टळतो, हे स्पष्ट झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.