मुंबई: जर आपण योगासनांमध्ये शीर्षासन करत असाल तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. अनेक आजारांपासून शीर्षासन तुम्हाला दूर ठेवतो.
डोकं खाली आणि पाय वर करण्याला शीर्षासन म्हणतात. यात हातांच्या आधारे विविध कोनांमध्ये शरीराला उलटं केलं जावू शकतं. पूर्ण शरीराचं संतुलन डोक्याच्या आणि हातांच्या भरवशावर असतं.
शीर्षासनामुळं रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, डोक्यातील रक्तप्रवाह वाढल्यानं मेंदू सक्रीय होतो. ग्रंथींची कार्यप्रणाली दुरुस्त होते, पोटाजवळील अंग जसे लिव्हर, किडनी, आतडे अॅक्टिव्ह होतात आणि पचनक्रीया चांगली राहते. ईसाचे प्रसिद्ध ग्रीक फिजिशियन हिप्पोक्रेट्स रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोऱ्यांनी त्यांना उलटं लटकवायचे.
परदेशामध्ये ‘इन्वर्जन थेरपी’च्या नावानं ज्यांना ओळखलं जातं ज्यात फ्लेक्सिबल बेडसारख्या टेबलवर हे आसन केलं जातं. पायांना ग्रीपमध्ये बांधण्यासाठी शरीराला उटलं लटकवलं जातं. यात शरीराचा संपूर्ण भार डोक्यावर आणि हातांवर येतो आणि फ्लेक्सिबल टेबल असल्यानं दुखापतीची भीती नसते. डिप्रेशननं ग्रस्त असलेल्या लोकांना याचा फायदा त्यांना मिळतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.