गर्भावस्थेदरम्यान ४०% भारतीय महिलांचं वजन सामान्यपेक्षा कमी

भारतीय महिला जेव्हा गर्भावस्थेत असतात, तेव्हा त्यातील ४० टक्के महिलांचं सामान्यपेक्षा कमी वजन असतं, असं एका अभ्यासात पुढे आलंय. जेव्हा की भारतापेक्षा आफ्रिकेत अधिक निर्धन लोक आणि जास्त प्रजनन दर आहे. तरी तिथल्या केवळ १६.५ टक्के गर्भवती महिलांच्या वजनाची टक्केवारी सामान्यपेक्षा कमी आहे. 

PTI | Updated: Mar 4, 2015, 05:53 PM IST
गर्भावस्थेदरम्यान ४०% भारतीय महिलांचं वजन सामान्यपेक्षा कमी title=

वॉशिंग्टन: भारतीय महिला जेव्हा गर्भावस्थेत असतात, तेव्हा त्यातील ४० टक्के महिलांचं सामान्यपेक्षा कमी वजन असतं, असं एका अभ्यासात पुढे आलंय. जेव्हा की भारतापेक्षा आफ्रिकेत अधिक निर्धन लोक आणि जास्त प्रजनन दर आहे. तरी तिथल्या केवळ १६.५ टक्के गर्भवती महिलांच्या वजनाची टक्केवारी सामान्यपेक्षा कमी आहे. 

अमेरिकेच्या प्रिंस्टन महाविद्यालयाच्या व्रुडो विल्सन स्कूल ऑफ पब्लिक अँड इंटरनॅशनल अफेअर्सच्या शोधकर्त्यांना आपल्या अभ्यासात भारत आणि आफ्रिकेतील गर्भवती महिलांचं वजन अवघ्या सात किलोनं वाढतं. जेव्हा की, ते दुप्पट वाढायला हवं, असा निष्कर्ष समोर आलाय. 

याबाबत विद्यालयाची सिचर्सची पीएचडी विद्यार्थिनी डियाने कॉफनं सांगितलं, हा निष्कर्ष म्हणजे भारतात मातृत्वाबाबत धोक्याची घंटा आहे. तिने सांगितलं, मुलांचं आरोग्य हे समाजात कसं असेल त्याची सुरूवात गर्भधारणेपासूनच होते. भारतानं याबाबत गंभीर पावलं उचलून गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

डियानेनं तीन भारतीय गावांमधील आई आणि मुलांच्या आरोग्याचा अभ्यास केला. तिला आढळलं की, गर्भवती आई अपेक्षित वजन प्राप्त करू शकत नाही. गर्भधारणेदरम्यान वजन वाढणं मातृत्व स्वास्थासाठी आवश्य आहे. कुपोषित मातेपासून जन्मलेलं बाळ हे कमी वजनाचं असतं. त्यामुळं त्यांची उंची, मानसिक आरोग्य आणि प्रकृतीवर आयुष्यभर परिणाम होतो.

गर्भवती महिलांचं वजन हे सामान्य महिलांच्या वजनापेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहायला हवं. डियाने म्हणते, भारतात गर्भवती महिला आणि त्यांचं बाळ हे पितृसत्ताक समाजाच्या दुष्परिणामांनी प्रभावित होतात. तरुणी, नवविवाहित महिला ज्या गर्भधारणेसाठी फीट असतात. त्या चुप राहतात, अधिक मेहनत करतात आणि खातात कमी, त्यांच्याकडून समाज तशी अपेक्षा ठेवतो, हे चुकीचं आहे. त्यामुळं पुढची पिढीच कमकुवत होऊ शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.