मुंबई : गरीबांच्या घरातील बदाम अशी शेंगदाण्याची ओळख. हिवाळ्यात स्निग्ध पदार्थांची शरीराला अधिक गरज असते. यामुळे थंडीत शेंगदाणे खाणे चांगले. यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. मात्र रोज शेंगदाणे खाल्ल्याचे फायदे ते खाणाऱ्यांनाही कदाचित माहिती नसतील.
शेंगदाणे खाण्याचे हे १० फायदे
शेंगदाण्यात स्निग्धता असल्याने पोटाच्या तक्रारीवर फायदेशीर ठरते. याच्या नियमित सेवनामुळे गॅस, अॅसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळते.
ओला खोकला असल्यास त्यावर शेंगदाणा उपायकारक ठरतो. यामुळे पाचनशक्तीही वाढते तसेच भूक न लागण्याची समस्याही दूर होते.
गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन करणे चांगले. यामुळे गर्भावस्थेत मुलांच्या विकासासाठी मदत होते.
शेंगदाण्यात ओमेगा- फॅट अधिक प्रमाणात असते. जे त्वचेसाठी उपयुक्त असते.
शेंगदाण्यामुळे कोलेस्ट्रॉल नियमित राहण्यात मदत होते.
जेवणानंतर ५० ते १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास तर आरोग्य चांगले राहते. खाल्लेले भोजन पचते. शरीरात रक्ताची कमतरता होत नाही.
शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहातो. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण ५.१ टक्क्यापर्यंत कमी होते.
शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटामिन आणि अँटीऑक्सिंडट्स मोठ्या प्रमाणात असतात.
शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटामिन डीची मात्रा अधिक असते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात.
रोज थोड्या थो़ड्या प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमध्ये हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.