गौप्यस्फोट: चेन्नईच्या मालकाचा जावईही गोत्यात?

विंदूचे BCCIचे अध्यक्ष आणि CSKचे मालक श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपन याच्या संपर्कात असल्याचे त्याच्या चौकशीतून बाहेर आले आहे.

Updated: May 22, 2013, 02:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
IPL फिक्सिंग प्रकऱणात अभिनेता विंदू दारा सिंगने मोठा गौप्यस्फोट केला आहे. विंदूचे BCCIचे अध्यक्ष आणि CSKचे मालक श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपन याच्या संपर्कात असल्याचे त्याच्या चौकशीतून बाहेर आले आहे. या चौकशी दरम्यान मोठा खुलासा करण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांना विंदूच्या कॉलमधून श्रीनिवासन यांच्या जावयाचा नंबर मिळाला आहे. तसच त्याबरोबर त्याला केलेले कॉल लॉगही मिळाले असल्याचे समजते आहे.

श्रीनिवासन यांच्या जावयाची चौकशी होणार गुरूनाथ मय्यपन याच्याविरोधात पुरावे असल्याचे सांगण्यात येते आहे. यामुळे IPL फिक्सिंग प्रकरणी श्रीनिवासन यांच्या जावयाची चौकशी होणार आहे. अभिनेता विंदू दारासिंग हा सतत बुकींच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आलीये. संजय जयपूर आणि पवन जयपूर या बुकींना देश सोडून जाण्यास त्यानं मदत केली होती, असंही समोर आलं आहे.
आयपीएलची मोठी टीम आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आलीय. एका मोठ्या टीमच्या मालकाशी आपले जवळचे संबंध आहेत. अशी कबुली विंदु दारा सिंगनं आपल्या कबुली जबाबात दिली आहे. त्या मालकाच्या जावायचेही बुकीशी संबंध असल्याचा दावा विंदूनं केला होता. विंदुच्या या कबुलीजबाबामुळे आयपीएलमधली ही बडी टीम वादात सापडलीय. त्या टिमच्या जावयाशीची मुंबई पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. दरम्यान आणखी बॉलिवूडचे चार कलाकारही या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. यामधील एक संगीतकार असल्याची माहिती आहे. या चारही जणांवर मुंबई पोलिसांचा स्पॉट फिक्सिंगप्रकरणवर संशय आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.