www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाबाबत बोलताना आपण निर्दोष असल्याचं, आरोपी अजित चंडिलानं ‘झी मीडिया’सोबत केलेल्या खास मुलाखतीमध्ये म्हटलंय. ‘चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल आणि आपण निर्दोष सिद्ध होऊ’ असंही त्यानं म्हटलंय. अजित चंडिलाच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर चंडिला दोन दिवसांच्या जामिनावर आहे.
‘मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्याबरोबरही न्याय होईल आणि सगळ्या गोष्टी उघड होतील. मला विश्वास आहे माझ्याबरोबर चांगलंच होईल, न्याय होईल... मी क्रिकेटर आहे, दहशतवादी नाही’ असं यावेळी चंडिलानं म्हटलंय. या कठिण प्रसंगी कुटुंबाची भक्कम साथ लाभल्याचंही चंडिलानं म्हटलंय.
‘ज्या दिवशी मला अटक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्या भावाला बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागलं... माझ्या आयुष्यात सध्या खूप अडचणी भरल्यात... मी देवाला प्रार्थना करीन की जे माझ्यासोबत झालं ते इतरांसोबत होऊ नये’ असंही चंडिलानं म्हटलंय.
पाहूयात झी मीडियानं त्याच्याशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.