www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अकोला येथील कपिल वैद्य याने जेईई मेन्सप्रमाणे जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर राज्यात मुलींमध्ये मुंबईच्या शलाका कुलकर्णीने बाजी मारली आहे. तसेच नागपुरचा रुपांशू गणवीर हा विद्यार्थी एससी प्रवर्गातून देशात पहिला आला आहे.
जेईई मेन्सचा निकाल जाहीर झाल्यानंतर 25 मे रोजी देशभरातील केंद्रांवर जेईई अॅडव्हासनची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 1 लाख 26 हजार 997 विद्यार्थी बसले होते. यापैकी 27 हजार 151 म्हणजेच उपलब्ध प्रवेश क्षमतेच्या सुमारे तिप्पट विद्यार्थी आयआयटीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरले आहेत.
देशातील अभियांत्रिकी आणि इंडियन इन्स्टिटयूटस ऑफ टेक्नॉलॉजीतील ( आयआयटी) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रस एक्झामिनेशन अॅडव्हान्स परिक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला.
कपिलने 360 पैकी 307 गुण मिळवले तर शलाकाने 281 गुण मिळवले आहेत. रुपांशू 301 गुण मिळवत उत्तीर्णांच्या यादीत 24 वा क्रमांक तर राज्यात खुल्या गटातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.