ब्रेन कॅफे सायन्टीस्ट स्पर्धेला सुभाष चंद्रांची उपस्थिती

विद्यार्थांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी ब्रेन कॅफेतर्फे सायन्टीस्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, विद्यार्थांचे कलागुणा साऱ्या जगासमोर यावेत याच उद्देश या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होतं. यामुळे या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद होता.

Updated: Nov 27, 2011, 12:46 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

ब्रेन कॅफेतर्फे मुंबईत बडींग सायन्टीस्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलय. या स्पर्धेत मुंबई, हैद्राबाद,आणि पुण्यातून 22 निवडक विद्यार्थी अंतिम स्पर्धेत सहभागी झालेत. त्यातल्या सर्वोत्तम वैज्ञानिक वस्तूंना एस्सेल ग्रूपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. हवेच्या दाबाने बाटल्यामध्ये होणारे आवाज, धावणारी गाडी, रोबोटिक हात हे आकर्षक वैज्ञानिक प्रयोग.

 

ब्रेन कॅफेतर्फे आयोजित केलेल्या बडींग सायन्टीस्ट स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी केले. या वैज्ञानिक प्रयोगाच्या स्पर्धेत मुंबई, हैद्राबाद, पूण्यातून  22 निवडक विद्यार्थी अंतिम स्पर्धेत सहभागी झाले. त्यातल्या सर्वोत्तम वैज्ञानिक वस्तुंना एस्सेल ग्रूपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांना त्याचे आविष्कार सादर करायला हे एक उत्तम व्यायपीठ असल्याचं विद्यार्थ्यांनी आणि परिक्षकांचे मत आहे.  विद्यार्थांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी ब्रेन कॅफेतर्फे सायन्टीस्ट स्पर्धेचं आयोजन  करण्यात आलं होतं, विद्यार्थांचे कलागुणा साऱ्या जगासमोर यावेत याच उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होतं. यामुळे या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद होता. विद्यार्थांनी अत्यंत हिरीरीने या स्पर्धेत भाग घेतला होता.

 

या विद्यार्थ्यांनी चुंबकीय लॅविटेटर, जनरेटर, लिफ्ट, पिनहोल कॅमेरा, झायलोफोन, वायुभार मापक असे आविष्कार सादर केलेत. मुख्य वैशिष्ट म्हणजे खेड्य़ापाड्यातुन हे आलेले विद्यार्थ्य़ाचे एस्सेल ग्रूपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी भरभरुन कौतुक केलं. झी लर्नच्या या उपक्रमामुळे भारताच्या विविध भागातील विद्यार्थ्यांना  एकत्रित आणुन त्याच्या ज्ञानाला चालना देण्याच काम होत आहे.