www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
एस. श्रीसंत याचे करिअर संपविण्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गोलंदाज हरभजन सिंग या दोघांचा हात आहे, असा आरोप श्रीसंत याच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची आहे.
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आलीये. फास्ट बॉलर श्रीसंत याला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तर त्याचसोबत राजस्थान रॉयलच्या अंकीत चव्हाण आणि अजित चंडालिया या खेळांडूंव्यतिरीक्त सात बुकिंना अटक करण्यात आलीये. तर अन्य दोन बुकी फरार झाले आहेत.
एस. श्रीसंत याच्या अटकेसाठी महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग जबाबदार आहेत. एका वृत्तवाहिनी श्रीसंत याचे वडील बोलत होते. या दोघांनी कट रचून श्रीसंतला अडकविले आहे. धोनीला श्रीसंत नको होता. धोनीने धमकी दिली होती, तुझे करिअर संपुष्टात आणण्याची. तर श्रीशांत आणि हरभजन सिंग विरुद्ध वाद Twitter च्या माध्यमातून पुढे आणण्यात आला होता. यापाठीमागे कोणाचा तरी हात आहे, असे श्रीसंत याच्या वडिलांचे म्हणणे आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.