ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचे मुंबईत निधन

ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचे अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. विनय आपटे यांनी १९७४ पासून अभिनयाला सुरुवात केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2013, 12:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचे अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. विनय आपटे यांनी १९७४ पासून अभिनयाला सुरुवात केली.
विनय आपटे हे एक अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक होते. त्यांनी निर्मित्याची भूमिका बजावली आहे. अभिनयात विनय आपटे यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. विजय तेंडुलकरांनी लिहलेल्या मित्राची गोष्ट यासह असंख्य नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. त्यांच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचीच ती सुरूवात होती. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत असंख्य नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या विनय आपटे यांना मित्राची गोष्ट हे त्यांच्या कारकीर्दीतलं सर्वांत महत्त्वाचं नाटक वाटतं.
मराठी नाटक, चित्रपटांसह हिंदीमधील सत्याग्रह, इट्स ब्रेकिंग न्यूज, चांदनी बार, एक चाळीस की लास्ट लोकल आदी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. तर झी मराठीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत अफलातून भूमिका साकारली होती. मुक्ता बर्वे हिच्या वडिलांची भूमिका केली होती. ही भूमिका घराघरात पोहोचली होती.
विनय आपटे यांच्या 'गणरंग' या नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक होते. 'डॅडी आय लव्ह यू', 'तुमचा मुलगा करतो काय? आदी नाटकांसाठी त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. 'कमलीचं काय झालं?' हे त्यांचे व्यवस्थापक म्हणून शेवटचे नाटक ठरले.
उत्कृष्ठ निर्माता, हरहुन्नरी कलाकार
१९७४पासून दूरदर्शनमध्ये कामास सुरुवात. रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि सिनेमा या तिनही प्रकारात विनय आपटे यांचा विशेष ठसा होता. आपली अशी वेगळ्या धाटणीची ओळख निर्माण केली होती.
कोणतीही भूमिका साकारताना एका वेगळ्याच स्टायलीत संवादफेक ही त्यांच्या अभिनयाची विशेष बाब होती. त्यांच्या आवाजात भारदस्तपणा होता.
विनय आपटे यांनी कॉलेजमधून एकांकितेतून रंगभूमीवर सुरुवात केली. दूरदर्शवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करत कामाला सुरूवात केली. १९८४ च्या आशियाई गेम्सचं वृत्तांकन केलं. तर १९८२ मध्ये गांधी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली. मराठीत 'डेली सोप' चा फार्म्युला रुजवण्याचं श्रेय आपटे यांना जाते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.