पाकड्यांबरोबरचे सामने उधळून लावा - बाळासाहेब
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळण्याबाबतच्या निर्णयाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत समाचार घेतलाय. झाले गेले कसे विसरायचे ? असा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना सवाल करत सामने उधळून लावण्याचा आदेश देशप्रेमींना दिलाय.
बाळासाहेबांच्या भेटीसाठी छगन भुजबळ मातोश्रीवर....
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बाधंकाममंत्री छगन भुजबळ हे मातोश्रीवर पोहोचले आहेत.
बाळासाहेब.. मी पण गहिवरलो....
शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर त्यांचं भाषण व्हिडिओद्वारे ऐकवण्यात आलं.
बाळासाहेब गहिवरले... डोळ्यांत आलं पाणी...
मुंबई : शिवतिर्थावर सेनेचा ४७ वा दसरा मेळावा | आज पुन्हा शिवतिर्थावर वाघाची डरकाळी... व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी संवाद
तर अण्णा हजारेंसारखे हाल होतील - बाळासाहेब
भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींची पाठराखण केली. सामना या मुखपत्रात त्यांनी ठाकरी शैलीत अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांचा समाचार घेतलाय.
सेना-मनसे एकत्र यावी बाळासाहेबांची इच्छा
हे चित्र सत्यात यावं अशी तमाम मराठी माणसांची इच्छा असल्याचे अनेक पोस्टर आपण पाहिले आहेत. पण आता मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: ही इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.
राज ठाकरे वारसा पुढे नेईल- बाळासाहेब
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे माझ्यातील व्यंगचित्रकाराचा वारसा पुढे चालविणार असल्याचे मत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
राज-उद्धव एकत्र आल्यावर पोटात का दुखतं- बाळासाहेब
राज आणि उद्धव एकत्र आल्यावर इतरांच्या पोटात का दुखतं असं बाळासाहेबांनी म्हंटलं असतानाच, दुसरीकडे राजकारण हे राजकारणाच्या जागी आणि कुटुंब हे कुटुंबाच्या जागी असतं, असं राज ठाकरेंनीही म्हंटलंय
शिवसैनिक म्हणतात, बाळासाहेब `एकटे टायगर`
`एक था टायगर` नंतर आता खरी बातमी आहे ती मुंबईतल्या टायगरची... मुंबईत दादरमध्ये परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकटा टायगर, एकटा वाघ अशी मोठमोठी होर्डिंग्ज लावली आहेत.
कसाबच्या आधी याला फासावर लटकवा- बाळासाहेब
म्यानमार आणि आसाममधील घुसखोर बांगलादेशींसाठी शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईतील फोर्ट परिसरात हैदोस घातला. मात्र या साऱ्यात क्लेशकारक गोष्ट घडली.
बहिरा राष्ट्रीय प्राणी कोण, तर मनमोहन सिंग- बाळासाहेब
पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टाईम मॅगेझिननं अंडर अचिव्हर म्हणून संबोधल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्या ठाकरी शैलीत सिंग यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ' मनमोहन सिंग हे जागतिक पातळीवरील एक हास्यास्पद प्राणी बनले आहेत
मराठवाडा नवा पाकिस्तान - बाळासाहेब ठाकरे
मराठवाडा हा नव्याने पाकिस्तानची कास धरत आहे. मराठवाड्याचे क्षेत्र हे पाकिस्तान होत आहे, अशी ठाकरी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील संपादकीय लेखात केली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी लष्कर ए तैय्यबा हस्तक अबू जिंदाल तथा अबू हामजा हा मराठवाड्यातील आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.
शाहरूखवर आजीवन बंदीच घाला- बाळासाहेब
बॉलिवूड स्टार शाहरूख खानवर पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. सामनाच्या संपादकिय लेखात बाळासाहेबांनी लिहलं आहे की, शाहरूखवर पाच वर्षाची बंदी नव्हे, तर आजीवन बंदी लावली पाहिजे.
बिळात घुसण्याचा प्रयत्न करू नका - बाळासाहेब
नाशिकमध्ये मनसे सत्तेसाठी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. मात्र काल भाजप नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेूबांची भेट घेतली.
लोकांच्या सेवेसाठी – बाळासाहेब ठाकरे
मी पक्ष काढला आहे तो लोकांच्या सेवेसाठी. माझा दुसरा विचार नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगत केंद्राय कृषीमंत्री शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनिया गांधी, अण्णा हजारे यांच्यावर जोरदार ठाकरी हल्ला चढविला तर पुतण्या राज ठाकरे यांनी चिमटा काढला. मी मैदान मिळवण्यासाठी कोर्टात गेलो नाही, असा टोला शिवसेनाप्रमुखांनी हाणला.
शिवसेनाप्रमुख आणि मी !
संतोष गोरे २६ सप्टेंबर १९९३. स्थळ - मराठवाडा सांस्कृतिक मैदान, संभाजीनगर. याच ठिकाणी माझी शिवसेनाप्रमुखांबरोबर पहिली भेट झाली. अर्थात मैदानातल्या लाखो शिवसैनिकांमधला मी एक. विराट सभेला मार्गदर्शन करताना पहिल्यांदाच बाळासाहेबांना मी पहात होतो.
कन्नडिगांच्या आंदोलनाचे पडसाद पुण्यात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातल्या कन्नडिगांच्या आंदोलनाचं पडसाद पुण्यातही उमटलेत. पुण्यातल्या प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आलीय.
... तर गोळ्या घालीन - बाळासाहेब ठाकरे
‘मुंबई हीच महाराष्ट्राची राजधानी आहे. आर्थिक बिर्थिक मला माहिती नाही.’ ‘मुंबई कोणी महाराष्ट्रापासून तोडू पाहत असल्यास मी स्वतः बंदूक घेऊन गोळ्या घालीन’, असा सज्जड दम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐतिहासिक दसरा मेळाव्यात भरला.