मुंबईतील रविवारच्या सर्व परीक्षा रद्द

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईत उद्या रविवारी सकाळी बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शोकाकूळ परिस्थिती लक्षात घेवून रविवारच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 17, 2012, 10:18 PM IST

www.24taas.com,मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईत उद्या रविवारी सकाळी बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शोकाकूळ परिस्थिती लक्षात घेवून रविवारच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
बाळासाहेब यांच्या निधनानंतर मुंबईतील सर्वच व्यवहार उत्स्फुर्त बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
दरम्यान, कोकणातील शिवसैनिकांसाठी मुंबईत येणाऱ्यासाठी मडगाव ते मुंबई खास रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे रात्री दहावाजता मडगाववरून सुटेल.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त ४.४५ वाजता समजताच सर्वत्र दु:खाचा डोंगर शिवसैनिकांवर कोसळलला. महाराष्ट्राचा आधार हरपला. शिवसैनिक पोरके झालेत, अशी प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात ऐकायला मिळत आहेत.
शिवसैनिकांना बाळासाहेबांचे अखेरचे दर्शन घेता यावे यासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाडी सोडण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना मुंबईत येणे शक्य होणार आहे.