www.24taas.com , झी मीडिया, नंदुरबार
काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीतील सहकारी काँग्रेसला शह दिल्यानं काँग्रेसचा बलस्थान असलेला आदिवासी मतदार राष्ट्रवादीकडे वळविण्यावर भर दिलाय. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस सहकारी असले तरी नंदुरबार जिल्ह्यात मात्र इथं ते एकमेकांसमोर उभे ठाकलेत, हेच दृश्य नंदुरबारमध्ये दिसून आलं.
काँग्रेसचा गड असलेल्या नंदुरबारमध्ये मुसंडी मारण्याची राष्ट्रवादीची जोरदार तयारी सुरूय. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी नंदूरबारमध्ये राष्ट्रवादीची फौज उपस्थित होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. के. अण्णा पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.
या सभेमध्ये पीकेना अजित पवारांनी खास पाठिंबा दिला. मी आणि पवारसाहेब तुमच्यापाठीमागे आहे. तुम्ही कामाला लागा, असा सल्लाही दिली. विदर्भातल्या शेतक-यांना सहानभुती दाखवल्यानंतर आता नंदुरबारमधल्या आदिवासींना चुचकारण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होताना दिसत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.