मराठवाडा विद्यापीठात लिपीक, वाहन चालक पदासाठी भरती

शिक्षकेत्तर पदे खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून शुक्रवार दि. १२.०४.२०१३ पर्यंत विद्यापीठाच्या विहित नमुन्यात आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत.

Updated: Apr 2, 2013, 06:02 PM IST

www.24taas.com, नांदेड
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास महाराष्ट्र शासन, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे, शासन निर्णयामधील तरतूदी, विद्यापीठ नियम या अन्वये गट क संवर्गातील रिक्त नियमीत शिक्षकेत्तर पदे शासन मान्यतेच्या अधीन राहून सरळसेवेने भरण्यास्तव खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून शुक्रवार दि. १२.०४.२०१३ पर्यंत विद्यापीठाच्या विहित नमुन्यात आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ लिपीक – (अपंग प्रवर्ग) (५२०० – २०२०० ग्रेड पे रू. १९००)
कनिष्ठ लिपीक यासाठी एकूण दोन पदे भरण्यात येणार आहे. (अपंग प्रवर्गसाठी) ही दोन पदे रिक्त आहेत. १ कर्णबधीर आणि १ अल्पदृष्टी या अंतर्गत रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. त्याचसोबत इंग्रजी आणि मराठी टंकलेखन उत्तीर्ण असावा. संगणाकाविषयी उत्तम ज्ञान आवश्यक.

वाहन चालक – (५२०० – २०२०० ग्रेड पे रू. १९००)
वाहन चालक पदासाठी एकूण ३ जागा रिक्त आहेत. २ खुल्या गटासाठी तर एक जागा वि. जा. (अ) साठी भरण्यात येणार आहे. उमेदवार इयत्ता सातवी उत्तीर्ण असावा. तसेच हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना त्यास आवश्यक आहे. तसेच वाहन चालविण्याच्या ५ वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी www.srtmun.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.