www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांच्यावर महिला कॉन्स्टेबलनं लैंगिक छळाचा आरोप केलाय. भाजीभाकरेंविरोधात शहरातील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गेल्याच आठवड्यात भाजीभाकरेंची चिपळूणला बदली करण्यात आली होती. छावणी भागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त असलेले डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिला कॉन्स्टेबलनं केला होता. महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार केली गेलीये. त्यानंतर डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी याप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी केली आणि त्यांनी दिलेल्या अहवालावर मुंबईवरून डिआयजी कार्यालयानं भाजीभाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्य़ाचे आदेश दिल्याची माहिती आहे.
‘मी अधिकारी आहे तुझं आयुष्य खराब करू शकतो अशा धमक्या देत माझे शोषण करण्यात आल्याचं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय.’ भाजीभाकरेसह औरंगाबादच्या इतर दोन एसीपींविरोधातही संबंधित महिला कॉन्स्टेबलनं बलात्कार केल्याची तक्रार केली आहे.